मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांची रविवारी दुपारी अचानक तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खडसेंसाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्यामुळे खडसेंना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जात एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.