जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले आ.एकनाथराव खडसे यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृती आज दि.५ रोजी दुपारी अचानक प्रकुती खालावली होती. त्यामुळे त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागलीच जळगाव विमानतळावरून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जळगावातील गजानन हार्टकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई येथे नेण्यात येत आहे.