• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी दुरुस्तीचा वाद अन गॅरेज मालकाचा खून !

editor desk by editor desk
November 5, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
दुचाकी दुरुस्तीचा वाद अन गॅरेज मालकाचा खून !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दुरुस्त केलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याने गॅरेजवर आलेल्या एकाने माझी दुचाकी लागलीच दुरुस्त करुन दे असा म्हणून तगादा लावला यावेळी वादातून गॅरेज चालकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या खूनाच्या घटने प्रकरणी गॅरेज मालकाचा खून करणा-या दुचाकी चालकाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत बळाळ कसबे या गावी महेश संतोष बोरसे याचे मोटार सायकल दुरुस्तीचे शिवशक्ती मोटार नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे याने मोटार सायकल दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्याच्या मोटार सायकलमधे पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे तो गॅरेजवर पुन्हा आला. माझी मोटार सायकल आत्ताच्या आता दुरुस्त करुन दे असा तगादा ज्ञानेश्वर मासरे याने महेश बोरसे याच्याकडे लावला. माझे काम सुरु आहे, थोडे थांब तुझी मोटार सायकल दुरुस्त करुन देतो असे महेश बोरसे याने ज्ञानेश्वर मासरे याला म्हटले. मात्र ज्ञानेश्वर मासरे याला धीर नसल्यामुळे त्याने वाद घालून महेश बोरसे यास जमीनीवर आपटून जीवे ठार केले. वाद सुरु असतांना महेश बोरसे याचे वडील वाद सोडवण्यास आले होते.

त्यांना देखील ज्ञानेश्वर याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी मयत महेश बोरसे याचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड करत आहेत.

Previous Post

ठाण्याच्या डॉनला जळगाव पोलिसांनी घेतले सिनेस्टाईल ताब्यात !

Next Post

रात्रीच्या सुमारास घरातून थेट तरुणाने गाठली विहीर अन घडले ते धक्कादायक !

Next Post
रात्रीच्या सुमारास घरातून थेट तरुणाने गाठली विहीर अन घडले ते धक्कादायक !

रात्रीच्या सुमारास घरातून थेट तरुणाने गाठली विहीर अन घडले ते धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group