जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात वर्सी महोत्सवात मोठ्या उत्साहात सुरु आहे. याठिकाणी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोड्यातील संशयित प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (वय २४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांना बघताच पळून जात असतांना सिनेस्टाईल पोलिसांनी पाठलाग करुन संशयिताला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील प्रथमेश उर्फ डॉन याने ठाणे व पालघर येथे मोठे दरोडे टाकले आहे. दरोडा टाकल्यानंतर मुद्देमाल घेवून संशयित प्रथमे हा फरार होवून जायचा. त्याच्याविरुद्ध राज्यासह इतर राज्यात देखील दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. माहिती नसतांना संशयित जेरबंद एमआयडीसी पोलिसांना संशयित प्रथमेच याच्या लोकेशन किंवा इतर कोणतीही माहिती नव्हती. तरी देखील पथकाने संशयिताच्या हालचालींवरुन त्याला हेरले आणि त्याच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले.