मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते तर अनेक जिल्ह्यात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई इथं देखील हलवण्यात येऊ शकते. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकार सोमवारपर्यंत मनोज जरांगे यांनी नवीन जीआर देणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले, सध्या साखळी उपोषण सुरु आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मात्र आता समिती देखील कामाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ तारीख देली आहे. कुणीही गैरसमज करु नये.
सरकार जो नवीन जीआर देणार आहे. पण याचा मसुदा सोमवारी येणार आहे. यापेक्षा आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. समितीला आता राज्याचा दर्जा देण्यात आला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा भावांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आता संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, असे जरांगे म्हणाले. सरकारच्या प्रतिनिधींनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. शिंदे समितीची व्याप्ती ही राज्याची झाली पाहीजे. ही जरांगे यांची मागणी होती. त्यानुसार आता नवीन जीआर काढल्या जाणार आहे. मसुदा सोमवारी येणार आहे, मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली.