Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेपाळमध्ये रात्री भूकंप ७० जणांचा मृत्यू !
    क्राईम

    नेपाळमध्ये रात्री भूकंप ७० जणांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    नेपाळमधील काही जिल्ह्यात  शुक्रवारी रात्री 11.32 वाजता 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळमधील काठमांडूच्या वायव्येस 331 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर भूमिगत होते. नेपाळमधील दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

    जाजरकोटमधील स्थानिक अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, जिल्ह्यात किमान ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेजारच्या रुकुम पश्चिम जिल्ह्यात किमान ३६ लोक मृत पावल्याची माहिती समजत आहे. या दुर्घटनेनंतर देशातील तिन्ही सुरक्षा यंत्रणा जखमींना तत्काळ मदत करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, याबाबतची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.

    नेपाळच्या गृहमंत्रालयाने सांगितलं की, दैलेख, सल्याण आणि रोल्पा जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांतून लोक जखमी झाल्याची आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जखमींवर जाजरकोट जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाजरकोट हे काठमांडूपासून पश्चिमेला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबर रोजी, नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.