Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेतून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
    क्राईम

    धावत्या रेल्वेतून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील शिरसोली ते जळगाव दरम्यान दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ खांबा क्रमांक ४०६/२५ ते ४०६/२७ दरम्यान अंदाजे एका ३० ते ३५ वय गटातील इसमाचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव ते शिरसोली दरम्यान दापोरा शिवारातील रेल्वे रुळावर अंदाजे ३० ते ३५ वय गटातील पुरुष धावत्या रेल्वेतुन पडून खाली आल्याने मयत स्थितीत आढळला असल्याबाबत आज बुधवारी १ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवला आहे.

    दरम्यान, मृतदेहाच्या जवळ काळ्या रंगाचा बूट सापडला आहे. त्यावरूनच त्याची ओळख पटविता येणार आहे. कपडे देखील खराब झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

    जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.हे.काँ. अनिल फेगडे ,पो.हे.काँ.अनिल मोरे,पो.हे.काँ.सतिष हाळनोर, दापोरा पोलिस पाटील जितेश गवंदे यांनी सकाळी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जिथे सनई वाजणार होती… तिथेच पसरली शोककळा; अपघातात पित्याचा अंत

    March 14, 2026

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.