जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहितेवर एकाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता भाड्याच्या घरात राहत असून दि.३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २५ वर्षीय विवाहितेच्या घरी येवून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवले जर हि घटना कुणाला सांगितलीस तर तुझ्या दोन्ही मुलीना जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी संशयित आरोपीने विवाहित महिलेला दिली. त्यानंतर विवाहित महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापस पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.