मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील तरुणांना नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशन’ मध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रीज & AC) च्या 134 रिक्त अप्रेंटीसशिप जागांची भरती केली जाणार आहे. 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण आयटीआय उमेदवारांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी त्यानिमित्त चालून आली आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर, पुणे & नवी मुंबई असेल.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशनच्या माध्यमातून नागपूर युनिटसाठी 71, पुणे युनिटसाठी 53 आणि नवी मुंबई युनिटसाठी 10 अप्रेंटिस उमेदवार भरले जाणार आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 17 आणि कमाल 24 वर्षे वय असलेले उमेदवार महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशनच्या अप्रेंटीसशिप भरतीसाठी अर्ज करू शकतील. राखीव प्रवर्गातील एससी तसेच एसटी उमेदवारांना नियमानुसार 05 वर्षे सूट मिळेल, तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल. अर्ज भरताना खुला प्रवर्ग तसेच ओबीसी उमेदवारांना 150 रूपये फी भरावी लागेल. राखीव गटातील एससी, एसटी, पीडब्ल्यूडी व महिला उमेदवारांना फक्त 50 फी भरावी लागेल. पात्र उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023