Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात आढळला महिला पोलिसाचा मृतदेह !
    क्राईम

    घरात आढळला महिला पोलिसाचा मृतदेह !

    editor deskBy editor deskNovember 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना मुंबईतील मानखुर्द परिसरातून समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची समजत आहे.

    मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील राहत्या घरीत महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेतला. वर्षा शिंदे असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी पती आणि सासरच्यांवर गंभीर आरोपी लावले आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

    गेल्या दीड वर्षांपासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वर्षा शिंदे मंगळवारी सकाळी त्यांनी अचानक टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुंटुबिय गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल झाले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वर्षा शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे कौटुंबिक वादामुळे त्या अस्वस्थ होत्या. सततच्या वादाला कंटाळूनच त्यांनी मृत्यूला कवटाळलं असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी दिली आहे. ट्रॉम्बे पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.