लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मंत्रिमंडळाने नगरपालिका महानगरपालिकेच्या धर्तीवर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या जागांमध्ये वाढ केली आहे जिल्हा परिषद ला दहा जागा तर पंचायत समितीसाठी 20 जागा जळगाव जिल्ह्यात वाढलेले आहे यात कोणत्या तालुक्याला किती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद ला 67 जागा जळगाव जिल्ह्यात होते मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयामुळे त्यामध्ये दहा जागांची वाढ होऊन ही संख्या 77 वर गेली आहे जागांची संख्या वाढल्यामुळे अनेक इच्छुकांची संख्याही वाढणार आहे तसेच पंचायत समितीच्या जळगाव जिल्ह्यात 134 जागा होत्या त्यामध्ये 20 ने वाढ होऊन ते 154 वर गेले आहेत जळगाव जिल्ह्यात गट आणि गण यामध्ये झालेल्या वाढीव जागांमुळे अनेक नवीन चेहरे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांमध्ये दिसतील तसेच अनेकांचे गट गण यामध्ये विभागणी होणार यात काहीही शंका नाही कोणकोणते गट आणि गण विभागले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.