मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती तरी देखील अनेक नेत्यांचा गावात प्रवेश होत असल्याने आंदोलकांनी त्यांच्या चारचाकी गाड्या पेटविण्यास सुरुवात केली असल्याने आता राज्यातील आमदार देखील आरक्षणासाठी राजीनामा देवू लागले आहे. यात पहिला धक्का शिंदे गटाला देखील बसला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. राज्यात सध्या मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असताना रमेश बोरणारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मतदार संघातूनच बोरणारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर बोरणारे यांनी राजीनामा दिला आहे.