Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमीयुगुलांनी सकाळी लॉजमधील रूम बुक केला अन संध्यकाळी घडल ते धक्कादायक !
    क्राईम

    प्रेमीयुगुलांनी सकाळी लॉजमधील रूम बुक केला अन संध्यकाळी घडल ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskOctober 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    नेहमीच प्रेमीयुगुलांचा वावर अनेक हॉटेलसह लॉज परिसरात मोठ्या संख्यने असतो. असेच एक प्रेमीयुगुल देखील पुणे शहरातील वाघोली परिसरातील लॉजवर गेले असता त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील चंदननगरातील रहिवासी २० वर्षीय तरुणी कोमल सुनील बर्के व सचिन गोकुळ शिंदे (वय-२१) हे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाघोली परिसरातील एका लॉजवर गेले होते. तिथे गेल्यानंतर दोघांनी एक रुम बुक केली. आम्ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉजमध्ये थांबणार त्यानंतर चेक आऊट करणार असं दोघांनीही लॉजच्या मॅनेजरला सांगितलं होतं. दरम्यान, सायंकाळी सहा वाजून गेल्यानंतही दोघेही रुममधून खाली आले नाही. त्यावेळी मॅनेजरने रुममध्ये कॉल केला.

    वारंवार फोन करुनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मॅनेजरने लॉजवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यात सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी बेल वाजवली, तरी प्रेमीयुगुलांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा उघडून आत बघितलं असता, प्रेमीयुगुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कोमल ही डीएमएलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन हा खाजगी नोकरीला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.