जळगाव : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाण्याच्या मार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना तीन जणांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीन जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाण्याच्या मार्गावर पोहेकॉ उमेश पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्तव्यावर होते. त्या वेळी तेथे तीन जणांनी त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन केले. या प्रकरणी पोहेकॉ उमेश पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.