Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वे फाटक ओलांडणे बेतले जीवावर ; आईसह दोन मुलीना चिरडले !
    क्राईम

    रेल्वे फाटक ओलांडणे बेतले जीवावर ; आईसह दोन मुलीना चिरडले !

    editor deskBy editor deskOctober 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक राज्यात रेल्वेच्या धडकेत नियमित अनेकांचा मृत्यू होत असतांना एक धक्कादायक अपघात समोर आला आहे. एक परिवार रेल्वेचे फाटक ओलांडत असतांना बापाच्या समोर आई व दोन मुली चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कंकरखेडा विभागातील कासमपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. दिल्लीहून सहारनपूरकडे वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. कासमपूर फाटकावर नरेश हा आपल्या कुटुंबासह रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक लागली. यात महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मोना असं मृत महिलेचे नाव आहे. तर चारू आणि इशिका अशी मुलींची नावे आहेत.

    या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलीस आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांच्या मदतीने रेल्वे रुळांवरून त्यांचे मृतदेह उचलले. ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    #accident Train
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.