Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलानेच केली आईची हत्या ; कारण वाचून व्हाल थक्क !
    क्राईम

    मुलानेच केली आईची हत्या ; कारण वाचून व्हाल थक्क !

    editor deskBy editor deskOctober 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच वाशीलगतच्या कोपरी गावात राहणाऱ्या एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रूपचाँद रहेमान शेख (वय २१) असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी गावातील गावदेवी मंदिराच्या जवळच्या सागर भोईर इमारतीमध्ये महिलेचे नाव सलमा ऊर्फ जहानारा खातून रहेमान शेख (वय ४३) असे असून ती मुलगा रूपचाँद शेख याच्यासोबत राहत होती. कोपरी गावातच दुसऱ्या इमारतीत सलमाची विवाहित मुलगी जास्मीन राहण्यास आहे. सलमा ही घरकाम करून कुटुंब चालवत होती.

    मात्र तिचा मुलगा रूपचाँद हा काहीही काम करत नव्हता. त्यामुळे सलमाने त्याच्यापाठी कामावर जाण्याचा तगादा लावला होता. शनिवारी रात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास सलमाने रूपचाँदला कामावर जाण्याबाबत विचारले. या वेळी या माय-लेकामध्ये भांडण सुरू झाले. या वेळी रागाच्या भरात रूपचाँदने सलमाची गमजाच्या साह्याने गळा आवळून हत्या केली. जवळच राहणाऱ्याला जास्मीनला ही घटना समजताच तिने एपीएमसी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी रूपचाँदला पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.