मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणबाबत उपोषण सुरु असतांना आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.