Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव बसची धडक ; वृद्ध ठार तर तरुण जखमी !
    क्राईम

    भरधाव बसची धडक ; वृद्ध ठार तर तरुण जखमी !

    editor deskBy editor deskOctober 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कजगाव येथील पारोळा चौफुलीजवळ शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भरधाव बस चालकाने दिलेल्या धडकेत निंबा भिवसन कोळी (वय ६०, रा. गुढे ता. भडगाव) हे वृद्ध जागीच ठार झाले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गुढे येथील निंबा कोळी हे वृद्ध प्रसाद रविंद्र चौधरी (वय १६, रा. पिलखोड ता. चाळीसगाव) याला सोबत घेवून (एमएच १९ ऐएफ ३१२८) क्रमांकाच्या दुचाकीने गोंडगावकडून कजगावकडे येत होते. तर कजगावकडून भडगावकडे जात असलेली पुणे एरंडोल येथील (एमएच २० बीएल २६५२) क्रमांकाची बसने दुचाकीस्वाराला पारोळा चौफुलीजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर झाले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमींना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. तर दुचाकीवरील जखमी असलेल्या प्रसाद चौधरी याची प्रकृती चिंजानक आहे. या अपघातामुळे पारोळा चौफुलीवर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. याप्रकरणी पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.