जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेसह तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. २७ रोजी पहाटे चार वाजता संशयित इम्रान शहा याने अनधिकृतपणे महिलेच्या घरात प्रवेश करीत तिला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. फिर्यादीच्या पतीने सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास हातावर चावा घेत शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.