तुम्हाला जर बँकेत काम करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीची नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये एकूण १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
क्रेडिट ऑफिसर स्केल– ५० जागा या पदांसाठी जागा भरणे आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी, एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
क्रेडिट ऑफिसर स्केल यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
यासाठी परीक्षा शुल्क ११८० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ११८ रुपये आहे. या पदांसाठी वयोमर्यादा हि किमान २५ ते कमाल ३५ वर्षेअसणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.