नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक महिला आई होण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात तर काहीना मुल असल्यावर त्यांना चुकीची वागणूक तर काही तर पैश्यासाठी विक्री देखील करीत असल्याची प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणातील सिरसा येथे एका आईने पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या नवजात बाळाला विकलं. मुलाचे वडील संजीव कौशल याने आरोप केला आहे की त्याची पत्नी प्रियंका हिने तिची आई आणि भावासोबत मुलाची 4.5 लाख रुपयांना विक्री केली आहे.
पतीने सांगितलं की, त्याला सांगण्यात आलं की, मूल जन्मल्यानंतर दोन दिवसांनी आजारी पडलं नंतर त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई प्रियंकासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांनी मुलाची आई प्रियंका, आजी सीमा आणि प्रियंकाच्या भावाला अटक केली आहे. प्रियंकाचं संजीव कौशलसोबतं हे दुसरं लग्न आहे. पतीने सांगितलं की, 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रियंकासोबत त्याचं लग्न झालं होतं, मात्र काही महिन्यांनंतर त्याच्या भावाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्याच्या उपचारासाठी तो कधी गुरुग्राममध्ये तर कधी झज्जरच्या रुग्णालयात फिरत असे. याच दरम्यान, पत्नीचे माझ्या आईसोबत भांडण झाले आणि ती आई-वडिलांच्या घरी गेली.
प्रियंका गरोदर असल्याचे संजीव कौशलने सांगितलं. नंतर प्रियंकाच्या आईने तिला मुलगा झाल्याचं सांगितलं, पण त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं. त्यानंतर तो प्रियंकाशी बोलला, मात्र प्रियंकाने त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला संशय आल्याने त्याने सासरच्या शेजाऱ्यांकडे याची चौकशी केली. तेव्हा मुलाच्या मृत्यूबाबत काहीही कळू शकलं नाही. संजीवने पोलिसांत तक्रारही केली होती, मात्र कारवाई झाली नाही. याच दरम्यान, हर्षा मित्तल या व्यक्तीने मुलाची विक्री करण्यास मदत केली होती, त्याने त्याला फोन करून तुला पैसे देतो असं सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेल्याचं संजीवने सांगितलं. पोलिसांच्या चौकशीनंतर मुलाची विक्री झाल्याचं उघड झालं.