Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहाटे फिरण्यासाठी निघाले अन वृद्धाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    पहाटे फिरण्यासाठी निघाले अन वृद्धाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठमधील चौघुले प्लॉट परिसरात अर्जून चौधरी हे आपल्या पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्याला होते. रोज पहाटे शतपावली करण्यासाठी जात होते. दरम्यान गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४२१ – २ जवळ रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजता उघडकीला आले. परिसरातील अर्जुन चौधरी यांची ओळख पटविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना व नातेवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.