Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले !
    क्राईम

    आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले !

    editor deskBy editor deskOctober 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हिंगोली : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरु असतांना काही तरुणानी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उजेडात येत असतांना पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना हिंगोलीत देखील घडली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर असं मृत तरुणाचं नाव आहे.

    हिंगोलीच्या देवजना गावातील रहिवासी नवनाथ हा होता. त्याने बाळापूर आखाडा शिवारात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, नवनाथने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केली, असा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कल्याणकर हा सोयाबीन काढण्यासाठी शेतात मळणी यंत्र घेऊन गेला होता. मजुरांना मळणी यंत्र सुरू करून दिल्यानंतर त्यान जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला.

    आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करीत आहे, असं नवनाथने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, नवनाथच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पिंप्राळ्यात शोककळा : इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना योगेश वाघ यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    October 28, 2026

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026

    यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    October 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.