जळगाव : प्रतिनिधी
दहा वर्षांपासून आपत्य होत नसल्याने भावाला तिसरीही मुलगी झाल्याने ती महिनाभराची मुलगी दत्तक घेत तिच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली. तिला आपल्या गावी घेवून जातांना अचानक रेल्वेत राबीया हुमायू अन्सारी चिमुकलीची प्रकृती खालावून तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यामुळे त्या दाम्प्याने जिल्हा रुग्णालयात चिमुकलीचा छातीला कवटाळून धरीत मनहेलावणारा आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील हुमायू अन्सारी (वय ३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्त स्थायिक झाले आहेत. याठिकाणी ते एका रेडीमेट कापड कारखान्यात नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले तरी त्यांना आपत्य होत नव्हते. तर हुमायू यांच्या शालकाला तिसरी मुलगी झाली होती. त्यामुळे त्यांनी ही मुलगी त्यांनी आपल्या बहिणीला दत्तक म्हणून दिली होती. चिमुकलीला दत्तक घेतल्यापासून अन्सारी दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तीचे पालनपोषण करीत असतांना रविवारी अन्सारी कुटुंबिय महिनाभराच्या बालिकेला घेवून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले.
रेल्वेने प्रवास करीत असतांना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ महिनाभराच्या बालिकेची प्रकृती अचानक बिघडली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक चिमुकलीची प्रकृती बिघडल्याने अन्सारी दाम्पत्य प्रचंड घाबरून गेले होते. रेल्वेतील इतर प्रवशांनी त्यांना धीर दिला, त्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर हे दाम्पत्य उतरले. त्यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात चिमुकलीला दाखल केले. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुकलीची तपासणी करीत मयत घोषीत केले.