चोपडा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सातत्याने सुरु असतांना नुकतेच चोपडा-यावल रस्त्यावरील नारद-खरद फाट्याजवळ गजानन वेफर्स या दुकानाजवळ दि. २२ रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान दोन दुचाकींचा विचित्र अपघात होऊन त्यात एकजण जागीच ठार झाला असून दोन जखमी आहेत.जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असून गावातील जितेंद्र रामलाल पाटील यांच्याकडे सालदार म्हणून काम करीत असलेले मयत ताराचंद मोकड्या बारेला (२३) तालुक्यातील रस्त्यांच्या खड्यांनी आणखी एक बळी घेतला आहे. जाकेश कमलसिंग पावरा (३५) रामदयाल गौतम (२५, रा. जळगाव) हे दालमिलमध्ये काम करतात. ते दुचाकीने जळगाव जात होते.
मयत ताराचंद हा नारद येथे जात असता मागून येणाऱ्या दोघांच्या दुचाकीने खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात पुढच्या गाडीला मागून धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की, यात ताराचंद माकड्या बारेला हा जागीच ठार झाला. नितीन निकम (माचले), डॉ. भरत धनगर (वडती) आणि रस्त्यांवरील वाहतूक करणाऱ्या लोकांनी मदतकार्य करत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.