लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कापूस व्यापारी स्वप्नील शिंदे याच्या खून प्रकरणात एलसीबी व स्थानिक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे यात एक पोलीस कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मात्र त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला असून यात अजून काही आरोपी असू शकतात अशी शंका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान,पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची खळबळजनक माहिती आज पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे एका पत्रकार परिषदमध्ये दिली. याप्रकरणातील तो आरोपी कोण याची माहिती विचारली असता पोलिस अधीक्षकांनी तो तपासाचा भाग असून यात अजून गुन्हेगार असू शकतात व तपासावर परिणाम होऊ नये म्हणून आरोपींची नाव पोलीस अधीक्षकांनी सांगितली नाही. दरम्यान,पोलीस कर्मचारीच लुटपाट आणि खून प्रकरणात आरोपी निघाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून तो कर्मचारी आणि ते आरोपी कोण ? याबाबत चर्चेला उधान आले आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी आरोपींची
नाव उघड केली नाहीय. तसेच आरोपींचा पीसीआर न
घेता थेट न्यायालयीन कोठडी घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी सांगितले.
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.