Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोघे पिस्तुल घेवून माजविणार होते दहशत ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
    क्राईम

    दोघे पिस्तुल घेवून माजविणार होते दहशत ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

    editor deskBy editor deskOctober 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून तलवार, गावठी पिस्तुल घेवून दहशत माजविणाऱ्या आरोपींची संख्या वाढत असतांना पोलीस प्रशासन आता त्यांच्या मागावर राहून त्यांना बेड्या ठोकत आहे. नुकतेच भुसावळ शहरासह परिसरामध्ये गावठी कट्टे, काडतूस आढळण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह दोन जणांना अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पु. ओ. नाहाटा चौफुलीवर गावठी पिस्तुलाच्या धाकावर संशयित गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. यानुसार पथकाने नाहाटा चौफुलीवरून प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता. बोदवड) यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. संशयिताने गावठी पिस्तूल भुसावळ शहरातील तौसीफ अस्लम तडवी याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली. पोलिस हवालदाज सूरज पाटील व नाईक संकेत अरुण झांबरे यांनी प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता. बोदवड) यास नाहाटा चौफुलीवर अटक केल्यानंतर त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी व १० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाइल फोन असा ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करीवर घाव; पोलिसांच्या सापळ्यात वाहनासह आरोपी जेरबंद

    March 28, 2026

    जळगाव मनपा स्वीकृत सदस्यपद छाननीत भाजपचे तीन उमेदवार पात्र; दोन अर्जांवर तांत्रिक पेच

    March 28, 2026

    चुकून गोळी सुटल्याने अमळनेरात तरुण ठार !

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.