वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. या घटना रात्री नव्हे तर आता दिवसा देखील घडू लागल्याने पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही असा प्रश्न देखील उपस्थित होते आहे. नुकतेच तृतीयपंथीयांच्या दोन गटात कार्यक्षेत्र सोडून पैसे जमा केल्याच्या रागातून राडा झाल्याची घटना घडली आहे. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील तृतीयपंथीयांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जुन्या श्रीराम वार्डात शनिवारी हा प्रकार घडला. दरम्यान, हाणामारीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भर रस्त्यात झालेला सुरू असलेला हा राडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत 149 कलमअंतर्गत नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाटमध्ये तृतीपंथीनी पैसे गोळा करण्याकरिता आपआपले कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. अशातच शुक्रवारी तृतीयपंथीयांचा एका गटाने आपले कार्यक्षेत्र सोडत हिंगणघाट शहरात येत पैसे गोळा केले.शनिवारी ही बाब दुसऱ्या गटाच्या लक्षात आली. त्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने ऑटोने हिंगणघाट गाठत पैसे गोळा करणाऱ्या गटाला मारहाण केली. तृतीपंथीचे दोन गट आपसात भिडत असल्याच पाहताच नागरिकांनीही चांगलीच गर्दी केली होती. काहींनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइल कॅमेरात कैद केला. तृतीयपंथीचे दोन गट आपसात राडा करत असल्याचे कळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही गटातील सदस्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेत समज देत सीआरपीसीच्या कलम 149 अन्वये नोटीस देत समज दिली आहे.