लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे उपमुख्य मंत्री ना अजित पवार हे आज जळगाव दौर्यावर येणार होते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील सुपुत्र विक्रम याच्या विवाह निमित्त त्याला आशीर्वाद देण्यासाठी पाळधी येथे उपस्थित राहणार होते मात्र राज्यात कोरोनाचे संकट उभे राहिले असल्याने तातडीची बैठक लागल्याने त्याचा जळगाव दौरा रद्द झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पाळधी येथे दुपारी दोन वाजता आमदार गुलाबराव पाटील यांच्या घरी मुलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी दिली आहे.