जळगाव: जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती योजना जून २००८ मध्ये जाहीर करण्यात आली. “गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे” या उद्दात्त ध्येयपुर्तीकरिता जळगाव येथील सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना (एसडी-सीड) अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना २०२१ साठी जाहीर करण्यात आली आहे.
उपक्रमाची ध्येयपूर्तीकडे वाटचाल
· मागील तेरा वर्षात १४,३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
· एकूण ३,४५० हून अधिक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
· ४१,८०० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण
· विद्यार्थी हितासाठी १३८ संस्थांसोबत सहकार्य करार
· ८४ विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्था किंवा व्यक्तींकडून दत्तक
· २३२५ युवतींना प्रमाणपत्रासह सशक्तीकरण प्रशिक्षण
· २८८ हून अधिक विद्यार्थ्यांना तज्ञांकडून वैयक्तिक समुपदेशन
· शिक्षकांना प्रशिक्षण व पालकांचे प्रबोधन
शिष्यवृत्तीसाठी पात्रता (२०२० चे एसडी-सीड लाभार्थीच)
· जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी
· बारावीच्या ग्रामीण विभागातील विद्यार्थ्याने किमान ७० टक्के गुण तर शहरी विभागातील विद्यार्थ्याने ७५ टक्के गुण .
· सी ई टी /सी पी टी, नीट, जे.ई.ई. समकक्ष परीक्षेत चांगले गुण
· विद्यार्थ्याचे एकूण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा अधिक नसावे.
· अनाथ तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.
आवाहन
सेवाभावी व्यक्ती किंवा संस्था जळगाव जिल्ह्यातील गुणवंत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याने त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी मदत करून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवू शकतात. विद्यार्थी शिकत असलेल्या शाखेनुसार त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी देणगीदार एक विद्यार्थी एका वर्षासाठी दत्तक घेऊ शकतात.
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थांना ऑनलाईन इंटरनेटद्वारे अर्ज भरण्याची सोय
एसडी-सीड मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे एसडी-सीडच्या वेबसाईट www.sdseed.in विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी या वेबसाईट ची लिंक स्वतंत्रता दिवस १५ ऑगस्ट २०२१ पासून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरु राहील.
ऑनलाईन अर्ज भरून एसडी-सीड कडे पाठविण्याची प्रक्रिया
एसडी-सिडच्या वेबसाईट वर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज यशस्वीरीत्या भरण्याविषयी सर्व विस्तृत माहिती व मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर पोच पावतीची प्रिंट घेऊन त्यासोबत आवश्यक व बंधनकारक असणारी सर्व कागदपत्रे जोडून विद्यार्थ्यांनी ते एसडी-सीड कार्यालयात देलेल्या तारखेपर्यंत पाठवावीत.
तालुके, जळगाव शहर, महानगर पालिका क्षेत्र असे एकूण १६ गट तयार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे गटनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
समिती गठीत
एसडी-सिडच्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप नियोजनबद्ध होण्यासाठी २० सदस्यांची मार्गदर्शक समिती व १० सदस्यांची एक निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात समन्वयक नेमण्यात आले आहेत.
मार्गदर्शन समिती
मार्गदर्शन समिती मध्ये शिक्षण तज्ञ व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बिगर राजकीय सेवाभावी व्यक्तीमत्वांचा समावेश आहे. यात मा. प्राचार्य अनिल राव, प्राचार्य डॉ. अजित वाघ, श्री. मिलिंद कुलकर्णी, डॉ. विजय माहेश्वरी, प्रा. एस.व्ही. सोमवंशी, प्रा. डॉ. शांताराम बडगुजर, श्री. यु. डी. पाटील, प्रा. डी. टी. नेहते, प्रा. डॉ. विवेक काटदरे, प्रा. संजय दहाड, प्रा. सुरेश पांडे, डॉ. नरेंद्र जैन, डॉ.सौ. गौरी राणे, श्री. जे.टी. महाजन, सौ. पुष्पा भंडारी, श्री. शिरीष बर्वे, श्री. अजित कुचरीया, श्री. दादा नेवे, श्री. सुभाष लोढा,श्री. उमेश सेठिया यांचा समावेश आहे.
निवड समिती
निवड समितीमध्ये दहा जणांचा समावेश आहे. यात श्री. नीलकंठ गायकवाड, प्रा. एस. एस. राणे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी या संपूर्ण शिष्यवृत्ती योजनेची नियमावली तयार केली आहे. तर निवड समितीमध्ये नियमावली तयार करणाऱ्यांसह डॉ. आर.एस. डाकलिया, डॉ. सुरेश अलीझाड, नंदलाल गादिया, महेश गोरडे, राजेश यावलकर, सागर पगारिया यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना एसडी-सीड व्यतिरिक्त इतर विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी एसडी-सीडच्या वेबसाईट वर ज्ञानकोष या विभागात सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजिण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती योजनेचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख सौ. रत्नाभाभी जैन, कार्यध्यक्षा मीनाक्षी जैन आणि निवड समिती प्रमुख डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.