Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे : वृत्तसंस्था

    भरधाव वेगात आलेल्या ट्रकची महिलेला धडक बसली. अपघाताची ही घटना साक्री तालुक्यातील सामोडे चौफुलीवर शुक्रवारी सकाळी घडली. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. हिराबाई सदाशिव सोनवणे (वय ६०) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील हिराबाई सोनवणे या शुक्रवारी सकाळी बाजार करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी चौफुलीवर त्यांना दहिवेलकडून सटाण्याकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यांच्या दोन्ही पायावरून ट्रकचे मागचे चाक गेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या या घटनेनंतर हिराबाई यांना खासगी वाहनाने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना दुपारी हिराबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटनेला घातपाताचा रंग? पिंकी माळींच्या वडिलांचा खळबळजनक दावा

    February 11, 2026

    फसवणूक प्रकरणात फसले अभिनेता श्रेयस तळपदे; १२ जणांविरुद्ध पोलिस कारवाई!

    February 11, 2026

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.