लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतूने निखिल राजपूत व त्यांचे टोळीतील साथीदार यांनी पोलीस उपनिरीक्षक (प्रभारी)नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ यांचा गळा दाबून हल्ला केल्याची घटना रात्री घडली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने निखिल राजपूत सह सहा आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महेश भास्कर घायतड पोलीस उपनिरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २७ रोजी रात्री ००:३० चे सुमारास श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत,अक्षय न्हावकर उर्फे थापा,गोलू कोल्हे,नकुल राजपूत,आकाश पाटील,अभिषेक शर्मा,निलेश ठाकूर एक अज्ञात इसम त्यांचे नाव गाव माहीत नाही यांना इतक्या रात्री गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतूने त्यांनी संगनमत करून फिर्यादिस जीवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या गळा दाबून मारहाण करून शिवीगाळ केली तसेच हल्ला करून सरकार कामात अडथळा आणला म्हणून अरिपीतांविरुद्ध कायदेशीर सरकारतर्फे फिर्याद
आहे म्हणून भाग -५ गुरनं ३०७, ३५३,
३३२,१४३,१४७,१४९,५०४,५०६ प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.