Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दारू पिलेल्या तरुणाला दीडशे फूट खोल दरीत फेकले !
    क्राईम

    दारू पिलेल्या तरुणाला दीडशे फूट खोल दरीत फेकले !

    editor deskBy editor deskOctober 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक घटना या दारू पिवून झालेल्या असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ दारू पिऊन आरडाओरड करीत असल्याच्या रागातून सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील वलवाल गाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील वलवालचा रिचबारीपाडा येथील अमरसिंग डेका पावरा (वय २८) हा शनिवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मद्य प्राशन करुन संशयित नटवर ओजाऱ्या पावरा (वय ४३) याच्या घराजवळ आरडाओरड करीत होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात संशयित नटवर पावरा याने अमरसिंग पावरा यास घराजवळच असलेल्या सुमारे दीडशे फूट खोल दरीत ढकलून दिले.

    त्यानंतर अमरसिंग बराच वेळानंतरही घरी दिसून न आल्याने कुटूंबियांसह ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी अमरसिंग याचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनेबाबत धडगाव पोलिसांना माहिती दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पवारयां च्यासह पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दरम्यान, अमरसिंग यास नटवर पावरा याने खोल दरीत ढकलून दिल्याच्या संशयावरुन डेका मोलजी पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलीस ठाण्यात संशयित नटवर पावरा याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी नटवर पावरा यास अटक केली असून त्याला मंगळवारी (दि. १७) धडगाव न्यायालयात हजर केलेय यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

    #criem #nadurbar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.