• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आरोपी ललित पाटील सर्वात आधी चाळीसगावात तर १५ पथकांना देत होता गुंगारा !

editor desk by editor desk
October 18, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
आरोपी ललित पाटील सर्वात आधी चाळीसगावात तर १५ पथकांना देत होता गुंगारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पोलीसांचे १५ पथक ज्या आरोपीला पकडण्यासाठी गेल्या १५ दिवसापासून दिवस रात्र मेहनत करत होते. अखेर त्या आरोपीला पोलिसांनी कर्नाटकाच्या बंगळुरूमधून अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातील आरोपी ललित पाटील हा चक्क दोन राज्यात १५ दिवसापासून फिरत असल्याची देखील बाहेर आली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणून कोर्टासमोर उभं केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे.

या 15 दिवसात ललित पाटील दोन राज्यात लपून बसला होता. पाच शहरात तो गेला होता. पोलीस त्याचं लोकेशन ट्रेसही करत होते. पण प्रत्येकवेळी तो गुंगारा देऊन पळून जात होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याचा वेगळाच डाव होता. पण तो पकडला गेल्याने त्याचा डाव उधळला गेला आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर तो 15 दिवस फिरत होता. पोलिसांना गुंगारा देत होता. तो पकडला जात नव्हता. त्याचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. पोलीस जायचे आणि तो पळून गेलेला असायचा. तो फरार झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून इनपूट घेऊन त्याचा माग काढला जात होता. ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यावर तो सर्वात आधी चाळीसगावला गेला. नंतर धुळे, संभाजीनगर आणि मग गुजरातला गेला असल्याची देखील माहिती मिळत आहे.

गुजरातच्या जामनगरमध्ये ललित पाटील हा तीन दिवस लपून राहिला होता. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. तर पुणे पोलिसांनी दहा पथके तयार केली होती. अशी एकूण 15 पथके त्याच्या मागावर होती. त्यानंतर गुजरातमधून तो थेट समृद्धी मार्गाने सोलापुरात आला होता. सोलापुरातून तो कर्नाटकाला गेला. कर्नाटकातील बंगळुरू येथे असतानाच त्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली.

Tags: #criem#lalitpatilchalisgaon
Previous Post

घरात शॉर्टसर्किटमुळे आग ; माजी पालकमंत्री देवकर आप्पा धावले मदतीला !

Next Post

पौष्टिक आणि स्वादिष्ट पनीर पराठा; नोट करा हि रेसिपी

Next Post
पौष्टिक आणि स्वादिष्ट पनीर पराठा;  नोट करा हि रेसिपी

पौष्टिक आणि स्वादिष्ट पनीर पराठा; नोट करा हि रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group