जालना : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी भाऊबंदकीचा वाद नेहमी उफाळत असतोच. काही थोडक्यात मिटत असतात तर काही वाद हे शेवटच्या टोकापर्यत जात असतात. अशीच एक धक्कादायक घटना जालना तालुक्यातील मौजपूरी गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजपुरी गावात चुलत भावांमध्ये विहिरीच्या पाण्यावरून वाद झाला होता. हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. मात्र रात्री उशीरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला. या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली .घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह सपोनि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
याप्रकरणी मृत तरुणाचे वडील बाबासाहेब डोंगरे यांच्या फिर्यादीवरून सावळाराम डोंगरे, पंडित डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, नानीबाई डोंगरे, कविता डोंगरे, आसाराम डोंगरे, या 7 जणांविरुद्ध गुन्हा निर्घृण खून केल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात 5 जणांना अटक केली असून दोन फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. या घटनेने मौजपुरी गावासह जालना जिल्ह्यात एकच खबळ उडाली आहे.