जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय तरुण एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी मशनिरीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात राहूल दरबार राठोड (वय २२, रा. शेलगाव ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर ) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला तर जीवन गजानन चौधरी (रा. बेटावद ता. जामनेर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. राहुलचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शेलगाव येथील राहुल राठोड याचे कुटुंबिय गेल्या २० वर्षांपूर्वी कामानिमित्त जळगावात स्थायिक झाले आहेत. राहुल हा कुटुंबियांसह फातेमा नगरात वास्तव्यास होता. पुर्वी तो वेल्डींगचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. परंतु सोमवारपासून तो एमआयडीसीतील एस २८ सेक्टरमधील एका प्लास्टीकच्या कंपनीत कामाला गेला होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास तो कामावर हजर झाला. मशिनवरीवर काम करीत असतांना राहुल व त्याच्यासोबत काम करणाऱ्या जीवन चौधरी यांना मशिनरीचा शॉक लागून जबर झटका बसल्याने ते दोघे दूर फेकले गेले. यामध्ये राहुल राठोड याचा दुर्देवी मृत्यू झाला तर जीवन चौधरी या तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंपनीत कामावर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी राहुलचा त्याचा दुदैवी अंत झाल्याने जिल्हा रुग्णालयात राहुलचा मृतदेह बघून त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. त्याच्या आई कौसल, वडील दरबार भिका राठाडे, लहान भाऊ अर्जुन आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.