रावेर : प्रतिनिधी
रावेर तालूक्यातील मोरगाव खुर्द येथील शेतकरी भगवान महू महाजन (वय ६२) हे घटस्थापनेच्या दिवशी बेपत्ता झाले होते. दरम्यान, मोरगाव शिवारातील अटवाडे रस्त्यावर त्यांची मोटारसायकल तर त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत विहीरीच्या कुंडाजवळ आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान महाजन यांना स्टार्टरच्या पेटीजवळील लोंबकळणाऱ्या वीज तारांचा विजेचा धक्का बसून ते खाली डोक्यावर आदळल्याने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पुर्वाश्रमीचे केळी गृपचालक भगवान महाजन यांना गत अडीच वर्षांपूर्वी मोटारवाहन अपघातात मेंदुला गंभीर दुखापत झाल्याने ते नेहमी अस्वस्थ राहत होते.