नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात इस्त्राइल-हमास युद्धादरम्यान निदर्शने केली जात असतांना अमेरिकेत देखील काही जण इस्त्राइल तर काही जण विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहयाला मिळाले. यादरम्यान एएपीने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकेत एक मुस्लिम महिला आणि सहा वर्षीय मुलावर चाकूने अनेक वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील एका घरमालकाने त्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू महिली आणि मुलावर हा हल्ला केला आहे. दरम्यान त्या व्यक्तीवर हत्या आणि हेट क्राइमचा आरोप असून पोलिसांनी हे प्रकरण इस्त्राइल आणि हमास यांच्याशी संबंधीत असल्याचे म्हटले आहे.
या घटनेत सहा वर्षांच्या मुलावर चाकूने 26 वार करण्यात आले आहेत. विल काउंटी शेरीफ ऑफीसने दिलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलावर 26 वेळा वार झाले त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असून 32 वर्षीय महिला जी त्या मुलाई आई असल्याचे मानले जात आहे ती बचावली जाण्याची शक्यता आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या क्रूर हल्ल्यातील दोन्ही पीडित हे मुस्लिम असल्याने आणि हमास-इस्त्राइल यांच्यातील मीडल इस्टमधील संघर्षाच्या पार्श्वभूमिवर हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. ही घटना शिकागोपासून ६४ किलोमीटर पश्चिमेला झाली.
शेरीफ कार्यालयाकडून पीडितांच्या राष्ट्रीयतेबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र काउंसिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सच्या शिकागो कार्यालयाने मुलगा पॅलेस्टेनियन-अमेरिकन असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगकितले की, घरमालकाच्या हल्ल्याला विरोध करत महिलेने 911 क्रमांकावर कॉल केला. शेरीफ ऑफिसने हल्लेखोराचे नाव जोसेफ कजुबा असल्याचे सांगितले आहे. शेरीफ कार्यालयाने सांगितले की, घराच्या आत, एका बेडरूममध्ये दोघे आढळून आले, दोन्ही पीडितांच्या छातीवर आणि वरच्या अंगावर चाकूच्या अनेक जखमा होत्या.तसेच शवविच्छेदनादरम्यान मुलाच्या पोटातून सात इंचाचा लष्करी स्टाइलचा चाकू काढण्यात आला. पोलिस आल्यावर त्यांना काझुबा याला घराकडे जाण्याऱ्या रस्त्याच्या कडेला जमिनीवर बसलेला आढळला. त्याच्या कपाळावर जखमा होत्या. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि हेट क्राइम प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापूर्वी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.