वर्धा : वृत्तसंस्था
राज्यात अनेक अपघाताची मालिका सुरु असतांना एक धक्कादायक अपघात वर्ध्यात झाला आहे. भरधाव कार रस्त्यावर धावत असताना अचानक त्याचे चाक निघाले. वेग जास्त असल्याने हे चाक थेट समोर असलेल्या एटीएम मशिनमध्ये जाऊन अडकले. या थरारक घटनेमुळे एटीएमचं मोठं नुकसान झालं आहे.
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील तळेगाव शहरातील उड्डाणपूल परिसरात ही थरारक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात जात असलेल्या कारचे चाक निखळूले आणि थेट एटीएममध्ये जाऊन धडकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. थेट उड्डाणपुलावरून टायर खाली एटीएममध्ये शिरल्याच कळताच नागरिकांनी पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.
‘युएसएम’ध्ये नोकरीला असलेला अमरावती जिल्ह्याच्या धनेगाव येथील आशिष विजय येवले हा तरुण भाड्याने घेतलेली कार घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाला होता. दरम्याने तळेगाव येथील उड्डाणपुलावर कार दाखल होताच कारचे पुढील चाक निखळूनन पुलावरून थेट पुलाखाली असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर जाऊन आदळले. यात प्रसंगावधानाने कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. मात्र एटीएमच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. अपघाताची या विचित्र घटनेमुळे पाहणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून अधिक तपास करत आहेत. तसेच वाहन चालवताना वेग मर्यादा न ओलांडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.