वार्ताहर भाईदास पाटील: येथील ग्रुप ग्रामपंचायत भवरखेडे बु येथे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला व तसेच आपल्या महाराष्ट्र मधल्या मुंबई येथे झालेल्या 26.11.2008 रोजी दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना व नागरीकांना अभिवादन करण्यात आले भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांचे नमन करण्यात आले .
सर्व प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच किरण पाटील यांनी पुष्प गुच्छ अर्पण केले त्यानंतर
सामुहिक संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,
यावेळी उपसरपंच अजय ब्राम्हणे यांनी सामुहिक संविधान वाचन केले,आपल्या मनोगतात त्यांनी भारतीय संविधान सर्वाना समान अधिकार देऊन सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते भारतीय संविधान दिनाचे महत्त्व सांगुन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक संविधान वाचन केले.
यावेळी ग्रामसेवक संजीव पाटील यांनी संविधान विषयावर आपले मनोगत व्यक्त करत, आपले हक्क,अधिकार, व संविधानिक महत्त्व अधोरेखित केले,
या कार्यक्रमास सरपंच किरण पाटील,उपसरपंच अजय ब्राम्हणे, ग्रामसेवक संजीव पाटील ग्रामपंचायत सदस्य उगलाल पाटील,विजय सुर्यवंशी प्रशांत,पाटील,खंडु भिल,विवरे येथील दिलीप पाटील,पिंटू पाटील,मा,सदस्य,संजय भामरे,समाधान पाटील,गावातील नागरिक, वसंत शेठ लढे, रामभाऊ सोनवणे,कृष्णात सोनवणे,मुन्ना महाजन,प्रदीप पाटील,रोजगार सेवक नवल पाटील , ग्रा,प, कर्मचारी कैलास पाटील,रविंद्र भाऊ आणि गावातील नागरिक उपस्थित होते आणिअशा प्रकारे संविधान दिवस साजरा करण्यात आला.