यावल : प्रतिनिधी
यावल येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी यावल पोलिसांनी गोपनियरित्या तपासाची चक्रे फिरवुन १८ आरोपींना अटक करण्यात आली असुन या सर्व आरोपींना न्यायालयाने दि. १६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असुन पोलीसांनी मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश केला आहे. यात आंतरराज्य टोळीशी लागेबांधे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावलच्या पोलीस ठाण्यात मागील सप्टेंबर महीन्यात शहरातील कुंभारटेकडी परिसरातुन चोरीस गेलेल्या ट्रेक्टर चोरीच्या गुन्ह्याचा पोलीसांकडून शोध घेतले जात असतांना पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळीच हाती लागल्याने पोलीसांनी केलेल्या चोरट्यांवर कारवाईमुळे तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलीस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी लावलेल्या मोटरसायकल चोरीच्या तपासात १३ मोटरसायकल जप्त केल्या असुन यात पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणुन अर्जुन सुरेश कुंभार अशरफ उर्फ गोलु कलींदर तडवी, जावेद खान अशरफ खान, सागर उर्फ उमेश जितेन्द्र सपकाळे, देविदास उर्फ साहिल तलेश बारसे, विशाल दिलीप वाणी विनोद दौलत कुंभार, उमेश झग्गु घारू, संजय भगवान भोई, हर्षल सदांनद गजरे, रविन्द्र सुरेश कुंभार, आकाश राजु कुंभार, सुरेश आनंदा कुंभार, राजेश महाजन सर्व राहणार यावल आणी रविन्द्र पंढरी कोळी राहणार दहिगाव तालुका यावल यांना अटक करण्यात आली असुन या सर्व संशयीत आरोपींना पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्या. एस बी वाळके यांनी दिवसाची पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश दिले आहे.