नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात अनेक लोकांना मोबाईलवर फोन येवून अभिनंदन करून मोठ मोठे गिफ्ट तुम्हाला मिळाले आहे. असे सांगत असतात अन याच घटनेला अनेक लोक बळी पडून मोठी फसवणूक होत असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथे सायबर घोटाळेबाजांनी एका पोलिसाची 82 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
हताश झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर कलम 420/406 अन्वये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्या लोकांनी मला फोन केला आणि माझ्या मुलाने एका स्पर्धेत सफारी कार जिंकली आहे असं सांगितलं. पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी आधार कार्ड आणि काही बँक तपशील पाठवण्यास सांगितले जेणेकरुन त्यांना गाडी पाठवता येईल. पोलिसानेही सांगितलं तसेच केले. याच दरम्यान, फसवणूक करणाऱ्या लोकांनी पोलिसाच्या खात्यातून 82 हजार रुपये काढून घेतले. पोलीस कर्मचाऱ्याला बँक ट्रान्झेक्शनचा मेसेज आला. हे पाहून त्याला मोठा धक्काच बसला.
पोलिसाने यानंतर लगेचच तातडीने आपलं खातं बंद करून घेतलं आणि थेट एसपीकडे गेला. एसपी अंकुर अग्रवाल यांनी यावर तात्काळ कारवाई करत झारखंडमधील रहिवासी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. सर्व आरोपी बोकारो, झारखंडचे रहिवासी आहेत.
एसपींनी जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे आवाहन केले आहे. कोणाच्याही जाळ्यात अडकू नका आणि कोणालाही कोणतीही माहिती किंवा पैसे देऊ नका. अशी काही अडचण आल्यास तात्काळ माझ्याकडे किंवा संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करा, तत्काळ कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.