Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात दुचाकीला चारचाकीची जबर धडक ; एक जखमी !
    क्राईम

    धरणगावात दुचाकीला चारचाकीची जबर धडक ; एक जखमी !

    editor deskBy editor deskOctober 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा. बांभोरी ता.धरणगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील कैलास निंबा पाटील (वय-३९) हा बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरात दुचाकीने जात असतांना धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एक चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत कैलास पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर चारचाकी वरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर हा वाहन घेवून पसार झाला. दरम्यान, दुचाकीधारक कैलास पाटील याला तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ् दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कैलास पाटील यांनी धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी वाहनावरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर रा. दोगानवा ता. धरणपूर मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.