Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ईडीची मोठी कारवाई : ३१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !
    क्राईम

    ईडीची मोठी कारवाई : ३१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

    editor deskBy editor deskOctober 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यातील अनेक राजकीय नेते व उद्योजकांवर गेल्या काही वर्षापासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची कारवाई सुरु असतांना आज माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या सुमारे ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्‍या ७० मालमत्ता जप्त केल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जैन कुटुंबाने एसबीआयकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात अलीकडेच आर.एल. समूहावर ईडीने छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर मनीषदादा जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली असून या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व आर.एल. गोल्ड प्रा. लि. या कंपन्यांच्या ७० मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यात या कंपन्यांच्या मालकीच्या जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथील मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटमधून दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.