Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पैसे न दिल्याने पतीने पत्नीसोबत जे केले ते धक्कादायक
    क्राईम

    पैसे न दिल्याने पतीने पत्नीसोबत जे केले ते धक्कादायक

    editor deskBy editor deskOctober 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वर्धा : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढ होत आहे. यात अनेक परिवाराचे सुद्धा आयुष्य उधवस्त झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना वर्धा येथून समोर आली आहे. पतीने रागाच्याभरात आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलीये. पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असं मृत महिलेचं नाव आहे. तर राजेशसिंग राजदत्ता (५५) असं आरोपी पतीच नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. काल मजुरीच्या पैशांच्या कारणातून त्यांच्यात परत एकदा वाद झाला. त्यानंतर संतप्त पतीने पत्नीचं डोकं जमिनीवर ठेचून तिची हत्या केली. पत्नीने पैसे न दिल्याने पतीचा संताप फार वाढला होता. रागाच्या भरात तो पत्नीचं डोकं जमिनीवर आपटत राहिला. यातच महिलेचा मृत्यू झालाय. राहुल रामदास चांनपुरकर (४३) याने पुलगाव पोलिसांत घटनेबाबत तक्रार दाखल केली होती.

    पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी घटनेची दखल घेतलीये. पोलिसांनी आरोपी राजेशसिंग दखनी फैल परिसरातून अटक करत बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी पोलीस गावात चौकशी करून तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.