Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस कर्मचाऱ्यासह भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
    क्राईम

    पोलीस कर्मचाऱ्यासह भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskOctober 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झालेली असताना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावावर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत केला आहे. तसेच आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर शहरातील परिसरात घडली आहे. पीडितेचा सख्खा भाऊ तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार अत्याचार करत होता. इतकेच नव्हे तर, सहा महिन्यांपूर्वी नातेवाईक असणाऱ्या पोलीस कर्मचारी सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील घरी कोणी नसताना पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ज्यामुळे पीडित मुलीच्या मनात पूर्णपणे भीती निर्माण झाली होती. मात्र एकेदिवशी पीडित मुलीला आपण गर्भवती राहिल्याचे समजले. ज्यानंतर तिने स्वतः आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.

    या प्रकरणात सर्वात पहिल्यांदा पोलिसांनी पीडित मुलीच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतात, भाऊ शहरातून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासातून त्याला शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या. त्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर नात्यातील पोलीस कर्मचारी असणाऱ्या सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिले. ही माहिती मिळतात पोलिसांनी गांगुर्डे याच्यावर देखील गुन्हा दाखल केला. सध्या या सर्व घटनेचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. त्यांनी मुलीचा जबाब नोंदवून घेत आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.