नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलिसांची नजर जुगारी अड्ड्यावर असून सातत्याने कारवाई देखील होत आहे. नुकतेच नाशिकरोड परिसरात देखील जुगार खेळणा-या अकरा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील बिटको पॉईट भागात करण्यात आली. उड्डाणपुलाजवळील एमएसईबी कार्यालय नजीकच्या सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला गुरूवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास ज्ञानेश्वर एकनाथ जाधव (४८ रा.जगतापमळा,विजयनगर),महुर सुरेश निकम (रा.कॅनलरोड),नितीन शंकर चवटे (रा. साहीशांती नगर,गोरेवाडी),अरबाज इदरीज पठाण (रा.साईनाखनगर ना.रोड),गजानन जगन चव्हाण व सुनिल घनश्याम नुनासे (रा.दोघे बिटको उड्डाणपूलाखाली) आदी पत्यांच्या कॅटवर रम्मी जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ७ हजार ७०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार अनिल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक हिवाळे करीत आहेत.