सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरीसह दरोड्याचे प्रमाण मोठ्या संख्येने होत असतांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई करीत बँक लुटाण्याच्या तयारीतील 13 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाेलीसांनी त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह 6 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतून देण्यात आलेल्या माहितीनूसार अटकेतील संशयित हे उत्तर भारतासह नेपाळमधील आहेत. ते गॅस कटरच्या साहाय्याने बँक, सराफ दुकाने फोडण्यात सराईत आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयितांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयितामध्ये झारखंड आणि नेपाळमधील येथील युवकांचा या घटनेत समावेश आहे. राज कामी, दीपक जमाई, मुरसलीम शेख, इनामुल शेख, सुरज उलहक, मोहम्मद शेख, कमरुद्दीन शाहजुल, इंदामुलक शेख, शिवसिंग देवल, टिकाराम कोली, विक्रमसिंह नेगी, भरसाऊथ अर्कसाऊथ अशी अटकेत असलेल्या संशयित्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.