


मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारण कोण कधी मुख्यमंत्री होईल हे कुणीही सांगू शकत नाही तरी देखील सत्तेत असलेले तीन पक्षातील नेते आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी मोठी फिल्डिंग लावत असतात, गेल्या काही दिवसापासून अजित पवारांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असतांना आज खुद्द अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे.
अजित पवार म्हणाले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. ”बावनकुळे यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जनताच निर्णय घेत असते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालं तर वाईट वाटण्याचं कारण नाही” असं अजित पवार म्हणाले. या विधानामुळे खरंच देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला पवारांचं समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


