• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

८ वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार !

editor desk by editor desk
October 12, 2023
in क्राईम
0
८ वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना आता अल्पवयीन मुलाची घटना बीड जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत एका नराधमाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. शहरातील शासकीय निरीक्षण गृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अतिश असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो शासकीय निरीक्षणगृहात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिश हा नराधम आरोपी बीड शहरातील नगर रोडवर असलेल्या शासकीय निरीक्षणगृहात कार्यरत होता. १ ऑक्टोबर रोजी त्याने निरीक्षण गृहातील एका ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

याबाबत कुणाला सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, चिमुकल्याने ही बाब निरीक्षण गृहातील त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांना सांगितली. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर निरीक्षण गृहातील इतर ३ मुलांनीही आपल्यासोबत असा प्रयत्न झाल्याची माहिती अधीक्षकांना दिली. या घटनेनंतर निरीक्षण गृहाचे अधीक्षक सुदाम निर्मळ यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अतिश याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Tags: #police#rapeCrime
Previous Post

अन देहविक्री करणाऱ्या महिलेने मारली कारमधून उडी !

Next Post

जिल्ह्यातील उद्योजकांना संधी : जळगावात एकदिवसीय कार्यशाळा !

Next Post
जिल्ह्यातील उद्योजकांना संधी : जळगावात एकदिवसीय कार्यशाळा !

जिल्ह्यातील उद्योजकांना संधी : जळगावात एकदिवसीय कार्यशाळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group